तळवडेत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानास प्रतिसाद

पाचल : तळवडे येथे ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत महिला व बालकांचे आरोग्य तपासणी शिबिर झाले. सरपंच गायत्री साळवी यांच्या हस्ते फीत कापून शिबिराचे उद्घाटन झाले. या अभियानात उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग तपासणी, क्षयरोग तपासणी व ११ रुग्णांचे एक्स-रे करण्यात आले.

हिमोग्लोबिनची तपासणी, गरोदर माता व किशोरवयीन मुलींची तपासणी व मासिक पाळी स्वच्छता मार्गदर्शन, पूरक पोषण आहाराबाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले. त्याचप्रमाणे पीएमजेएवाय कार्ड काढण्यात आले. रुग्ण तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय कामले यांनी केली. शिबिर यशस्वीतेसाठी आरोग्य सहायक पाटील, एल. एच. व्ही. पाटोळे, सीएचओ समृद्धी जाधव, आरोग्य सेवक पी. एन. पाटील, फोंडेकर, किनरे, गटप्रवर्तक स्वरा नलवडे, आशा सेविका पराडकर, जंगम, गणवीर, जाधव, आरोग्य सेवक बेलवलकर, फिजा प्रभू यांनी सहकार्य केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 29/Sep/2025

Shanti real estate 1