रत्नागिरी : हर्चे-डोर्ले मार्गावरील झाडी अखेर तोडली

पावस : रत्नागिरी तालुक्यातील हर्चे ते डोर्ले रस्त्यावर दुतर्फा झाडी मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे वाहन चालकांना परिसर धोकादायक ठरत होता. अखेर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने रस्त्याशेजारील झाडे तोडल्याने रस्ता वाहतुकीसाठी सुखकर झाला आहे.

मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा पावसाळ्यामध्ये झाडी वाढल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनचालकांना वाहने चालवताना अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे अपघाताचा धोका होता. या संदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी आवाज उठवल्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुतर्फा झाडी व गवत काढण्यात रस्ता मोकळा झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:57 PM 22/Oct/2024

Cake of the day