चिपळूण-संगमेश्वरसाठी १७ उमेदवारी अर्जाचे वितरण

चिपळूण : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. मात्र, येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून १७ उमेदवारी अर्ज घेण्यात आले आहेत. सात उमेदवारांनी हे सोळा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडून घेतले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता प्रारंभ झाला आहे. मात्र, पहिल्या दिवशी कोणत्याही उमेदवाराने खाते खोलले नाही. मात्र उमेदवारांसाठी अर्ज घेण्यास प्रारंभ झाला आहे. विद्यमान आमदार शेखर निकम यांनी चार, संतोष पांडुरंग शिंदे (खेर्डी दत्तमंदिर) यांनी एक, महेंद्र पवार (कळंबुशी, ता. संगमेश्वर) यांनी एक, काँग्रेसचे सुनील सावर्डेकर (मु. कळवंडे) यांनी दोन, प्रशांत रमेश मोहिते (पाग-चिपळूण) यांनी एक, प्रशांत बबन यादव यांनी चार, सौ. स्वप्ना प्रशांत यादव (खेर्डी) यांनी चार असे एकूण १७ उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी वितरित केले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 23/Oct/2024

Shree clinic