रत्नागिरी : मोसमी पाऊस आपल्या हंगाम संपवून आता परतला असं वाटत असतानाच आज बुधवारी दुपारी रत्नागिरी शहर आणि परिसरात पुन्हा एकदा आभाळ भरून आलं आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. वेगवान वारे वाहत असून ढगांच्या गडगडाटासह अनेक ठिकाणी सरी कोसळायला सुरुवात झाली आहे. यामुळे नेमका पाऊस कधी जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान गेले दोन दिवस वातावरणातील उष्णता सुद्धा प्रचंड वाढली होती. या पार्श्वभूमीवर पावसाच्या सरी कोसळतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती तर दोनच दिवसांपूर्वी हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पावसाच्या सरी कोसळत आहेत अनेक ठिकाणी भात कापून शेतातच ठेवलेला असताना शेतकऱ्यांची गडबड उडणार असून आता दिवाळीची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे बाजारपेठांमधली गर्दी वाढली आहे. खरेदी वाढली आहे. पावसाच्या सरी जर अशाच कोसळत राहिल्या तर त्याचा परिणाम बाजारपेठांवरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा पाऊस किती वेळ राहणार याकडे आता शेतकऱ्यांसह नागरिकांचे लक्ष लागून राहिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:56 PM 15/Oct/2025














