रत्नागिरी : ‘न्यायव्यवस्थेच्या मागे शासन खंबीरपणे उभे राहिले आहे. वकिलांना आम्ही कधीच नाराज करत नाही. मंडणगडसारख्या छोट्या गावात आम्ही न्यायव्यवस्थेसाठी सुंदर अद्ययावत इमारत उभी केली. भविष्यात बार असोसिएशनच्या सर्व कामात माझे सहकार्य राहील, ती आमची जबाबदारी आहे,’ असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
येथील रत्नागिरी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या इमारतीच्या नूतनीकरण कामाच्या प्रारंभाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे, अॅड. अशोक कदम, अॅड. माधव भाटवडेकर, अॅड. विजय साखळकर, अॅड. राजशेखर मलुष्टे, अॅड. शाल्मली अंबुलकर, अॅड. अवधूत कळंबटे, अॅड. निनाद शिंदे, अॅड. प्रफुल्ल साळवी आदी उपस्थित होते. या प्रसंगी अॅड. पाटणे यांनी नूतनीकरण उपक्रमाचे स्वागत करत कामकाज अधिक सुकर व जनहितमुखी होईल, असा विश्वास व्यक्त केला तसेच कोकण आयुक्त आणि एएलटीचे कॅम्प रत्नागिरीत झाला पाहिजे तसेच वकिलांच्या हॉलकरिता १५० खुर्चांची गरज आहे, अशी मागणी त्यांनी केली. या दोन्ही मागण्या मंत्री सामंत यांनी तत्काळ मंजूर केल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:20 PM 03/Nov/2025













