रत्नागिरी : स्विगी आणि झोमॅटोला दणका! सायबर लॉ एक्सपर्ट ॲड. अमित नागवेकर यांच्या नोटिसीनंतर अन्न सुरक्षा विभागाने कठोर नियम जारी केले

रत्नागिरी (प्रतिनिधी): सायबर सिक्युरिटी व सायबर लॉ एक्सपर्ट वकील ॲड. अमित नागवेकर यांनी रत्नागिरीत ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्स (स्विगी व झोमॅटो) वरील अनियमितते विरुद्ध २० दिवसांपूर्वी कायदेशीर नोटीस दिल्यानंतर आता मोठी कारवाई झाली आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) महाराष्ट्र यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नवीन कठोर नियमावली जारी केली आहे.

आयुक्त FDA. श्री. तुकाराम मुंढे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जारी करण्यात आलेल्या या नवीन नियमांनुसार:
सर्व रेस्टॉरंट्सना वैध FSSAI लायसन्स असणे अनिवार्य.
खाद्यपदार्थांची हायजीन (स्वच्छता) आणि पॅकिंग (टँपर-प्रूफ पॅकिंग) यांचे कठोर पालन करणे बंधनकारक.
नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

ॲड. अमित नागवेकर यांनी स्विगी आणि झोमॅटोला पाठवलेल्या नोटिसीची प्रत FSSAI आणि FDA महाराष्ट्र यांना देखील पाठवली होती. त्यांच्या या सतर्क आणि जबाबदार पुढाकारामुळे प्रशासनाने तात्काळ कारवाई करत नवीन नियम जारी केले आहेत.
सायबर लॉ क्षेत्रातील जाणकार म्हणून ॲड. अमित नागवेकर केवळ फूड डिलिव्हरी क्षेत्रातील गैरप्रकारांवरच नव्हे तर सायबर गुन्हे, ऑनलाइन स्कॅम कंपन्या आणि फसव्या योजनां विरुद्ध सतत आवाज उठवतात. एक जबाबदार नागरिक आणि कायद्याचा रक्षक म्हणून ते भविष्यातही अशा सर्व विषयांवर कठोर कारवाईसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या विकासामुळे रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातील ग्राहकांना सुरक्षित अन्न मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. आता या नवीन नियमांचे काटेकोर पालन होईल की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:05 30-06-2026