राजापूर : ओणीत डिसेंबरमध्ये राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेचे आयोजन

माखजन : राजापूर तालुक्यातील ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ तर्फे जयवंत दळवी स्मृती राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २० ते २२ डिसेंबर या कालावधीत होणार आहे.

यावर्षी या स्पर्धेचे १०वे वर्ष आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी मुंबई येथे देखील होणार आहे. दि. ८ डिसेंबर रोजी नेहरू नगर कुर्ला (पूर्व) येथील प्रबोधन प्रयोग घर, नेहरू नगर उद्यान येथे सकाळी १० वाजता होणार आहे. १८ डिसेंबर रोजी रत्नागिरीत नवनिर्माण कॉलेज येथे सकाळी १० वाजता तर १९ रोजी ओणी येथे नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होणार आहे. या नाट्य स्पर्धेत प्रथम येणाऱ्यास रोख ३० हजार, द्वितीय २५ हजार, तृतीय २० हजार व प्रत्येकी शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. उत्कृष्ट अभिनयासाठी प्रथम येणाऱ्यास २ हजार, द्वितीय १ हजार ५००, तृतीय १ हजार २००, चतुर्थ १ हजार, पाचवा ८०० रुपये व प्रत्येकी शिल्ड व प्रमाणपत्र देऊन सन्मान होणार आहे. सर्वोत्कृष्ट लेखनासाठी प्रथम २ हजार व द्वितीय १५०० व प्रत्येकी शिल्ड व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी प्रथम २ हजार व द्वितीय १ हजार ५०० व प्रत्येकी शिल्ड व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सर्वोत्कृष्ट नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजनेसाठी १ हजार ५०० रोख व शिल्ड आणि प्रमाणपत्र देईन गौरविण्यात येणार आहे. प्रथम, द्वितीय, अंतिम फेरीमधील तृतीय वगळून उर्वरित पाच सहभागी संघांना रोख २ हजार रुपये दिले जाणार आहेत. अंतिम स्पर्धा नूतन विद्यामंदिराच्या श्रीमती मंगला मारुतीराव सावंत रंगमंचावर रंगणार आहेत. अधिक माहितीसाठी प्रमोद लिमये, विनोद मिरगुले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:06 PM 24/Oct/2024

Shanti 4