रत्नागिरी : राजिवडा व बेलबाग येथे गावठी हातभट्टी दारु विक्रीवर कारवाई

रत्नागिरी : शहरातील राजिवडा व बेलबाग येथे आपल्या ताब्यात गावठी हातभट्टीची दारु विक्रीसाठी बाळगून असलेल्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार 23 ऑक्टोबर रोजी 6.20 ते 7 वा. कालावधीत करण्यात आली.

एक महिला आणि विनायक सनगरे (54, रा. मधला फगरवठार, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. यातील महिला विना परवाना गावठी हातभट्टीची 5 लिटर दारु राजीवडा समुद्र किनारी तर विनायक सनगरे हा बेलबाग येथील एका घराच्या समोरील भागात 1 हजार रुपयांची 10 लिटर दारु विक्रीसाठी बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:22 PM 24/Oct/2024