पाली : दिव्यांगांसाठी शासन अनेक योजना व त्यांचे जीवनमान सुकर होण्यासाठी अनेक सुविधा निर्माण करत आहे. त्यामध्ये अनेक शासकीय सोयीसुविधांसाठी लागणारे दिव्यांग प्रमाणपत्र हे आजच्या शिबिरामधून पालीसारख्या ग्रामीण भागात देण्यात येत आहे.
त्याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन प्रगती साधण्याचे आवाहन डॉ. विकास कुमरे यांनी केले. ग्रामीण रुग्णालय येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अनेक दिव्यांग व्यक्तींची तपासणी करून ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आली. शिबिरासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिराला पालीचे सरपंच विठ्ठल सावंत यांनी शिबिराला भेट दिली. शिबिरात ५४ रुग्णांनी नोंदणी केली. त्यामध्ये १८ रुग्णांना विविध प्रकारची दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 11/Nov/2025













