चिपळूण काँग्रेसच्या प्रभारी शहराध्यक्षपदी संतोष सावंतदेसाई

चिपळूण : शहरातील खेंड येथील संतोष सावंतदेसाई यांची रत्नागिरी येथील काँग्रेस भवन येथे झालेल्या बैठकीत चिपळूण काँग्रेस शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने जिल्ह्यात संघटना बांधणीवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यातील तालुकानिहाय, पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गटनिहाय पदांची निवड केली जात आहे. त्या अंतर्गत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले तसेच जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्या संमतीने प्रभारी नूतन शहराध्यक्ष संतोष सावंत देसाई यांची निवड जाहीर करून तसे पत्र सुपूर्द करण्यात आले. तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांनी त्यांचे अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:54 PM 24/Oct/2024

Samarth gold