उद्या शक्तीप्रदर्शन करीत उदय सामंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार

रत्नागिरी : उद्या दिनांक २५ ऑक्टोबर रोजी शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. माजी आमदार बाळ माने यांच्या ठाकरे गटात झालेल्या प्रवेशानंतर महायुतीत किती आलबेल आहे याचा प्रत्यय उद्या येणार आहे. शिवसेना, बीजेपी आणि राष्ट्रवादी पक्षाचे सारेच कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र आहे. उद्या सकाळी १० वाजता स्वयंवर मंगल कार्यालय येथे पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर हॉटेल विवेक येथे भव्य सभा होणार आहे. बीजेपीचे रवींद्र चव्हाण हे देखील या सभेला उपस्थित राहणार आहेत. यानंतर येथे जमलेला जनसमुदाय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने उदय सामंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहे.

Ratnagiri Khabardar add image