दापोली विधानसभा मतदारसंघातून संजय कदम, योगेश कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल

दापोली : दापोली विधानसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार संजय कदम तसेच युतीचे उमेदवार योगेश कदम यांनी गुरुवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. गुरुपुष्य योगाच्या मुहूर्तावर दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक अधिकारी अजित थोरबोले यांच्याकडे दाखल केले आहेत. आतापर्यंत दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, संजय कदम यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यासह अर्ज दाखल केला. योगेश कदम यांनीही शक्तिप्रदर्शन करून अर्ज दाखल केला. यामुळे दापोलीत काहीकाळ लोकांची गर्दी बघायला मिळाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 25/Oct/2024

Ratnagiri Khabardar add image