राजापूर : शासनाच्या पीएम किसान, पीक विमा आणि अन्य कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अॅग्री स्टॅक प्रोगाम अंतर्गत फार्मर युनिक आयडी काढणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाकडून शेतकऱ्यांशी संवाद साधून जनजागृतीही केली जात आहे. आतापर्यंत ६४ हजार ११८ पात्र शेतकऱ्यांपैकी २७ हजार ५२४ जणांनी फार्मर आयडी काढले आहेत.
शेतकऱ्यांना आधारकार्डप्रमाणे त्याच्या शेतीविषयक सर्व माहिती उपलब्ध करून देणारा फार्मर युनिक आयडी देण्यात येत आहे. या आयडीच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यांची माहिती एकत्र संकलीत होत आहे. जेणेकरून त्या माहितीच्या आधारे शासनाला कृषी विषयक धोरण वा योजना राबविणे अधिक सुलभ होणार आहे. या व्यतिरीक्त फार्मर युनिक आयडीमुळे शेतकऱ्यांना पिकानुसार किसान क्रेडीट कर्ज, पिकांबाबत सल्ला, हवामानाबाबत माहिती व सल्ला, आपत्ती सल्ला व प्रतिसाद, बाजारभावाबाबत सल्ला, किड व इतर रोगांबाबत सल्ला, किटकनाशक वापरण्याबाबत सल्ला, मृदा आरोग्य माहिती यांसारखी शेतीपूरक माहिती उपलब्ध होणार आहे.
केंद्र सरकारच्या नव्या नियमाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने अॅग्री स्टॅक प्रोग्राम अंतर्गत आपले शेतजमीन आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. अन्यथा, शेतकऱ्यांना पीएम किसान, पीक विमा आणि अन्य कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर युनिक आयडी महत्वपूर्ण असले तरी, फार्मर युनिक आयडी काढण्यासाठी तालुक्यामध्ये थंडा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
राजापूर तालुक्यात आयडी काढण्यासाठी ६४ हजार ११८ शेतकरी पात्र ठरलेले आहेत. त्यापैकी २७ हजार ५२४ शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढले असून अद्यापही अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेले नसल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली. फार्मर युनिक आयडी काढण्याचे शंभर टक्के काम पूर्ण होण्यासाठी प्रशासनाकडून शेतकऱ्यांशी संवाद साधला जात आहे.
जनजागृती केली जात आहे. त्यानंतरही, शेतकऱ्यांकडून फार्मर युनिक आयडी काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून थंडा प्रतिसाद मिळत असल्याने फार्मर आयडी काढण्याचे शंभर टक्के काम पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:28 PM 17/Nov/2025














