संगमेश्वर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने कडवई ग्रुपग्रामपंचायत हद्दीत ग्रामस्थांच्या लोकसहभागातून व श्रमदानातून धामणाकवाडी येथील विहिरीशेजारी बंधारा बांधण्यात आला व विहिरीचा परिसर साफसफाई करण्यात आला.
या अभियानांतर्गत कडवईत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायत हद्दीतील धामणाकवाडी येथील पाणीपुरवठा विहिरीशेजारी ग्रामस्थांनी श्रमदान करत बंधारा बांधला तसेच विहिरीच्या आजूबाजूचा परिसर स्वछ करण्यात आला. या बंधाऱ्यामुळे या विहिरींची पाणीपातळी ही समतोल राहणार असून, तुटवड्याच्या काळात ग्रामस्थांना याचा चांगला फायदा होणार आहे. या वेळी सरपंच विशाखा कुवळेकर, ग्राम अधिकारी राहुल चौधरी, उपसरपंच दत्ताराम ओकटे, ग्रामपंचायत सदस्य अक्षता घरवेकर, आयडियल ग्रुपचे अध्यक्ष नीलेश कुंभार आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:41 PM 17/Nov/2025














