दापोली : मुरुड-कर्दे एसटी बस सुरू करण्याची मागणी

दापोली : तालुक्यातील मुरुड येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले असले तरी अद्याप एसटी बस सेवा बंदच आहे. गेले दीड महिना या मार्गावरून बस सेवा बंद आहे. यामुळे कर्दे, मुरुड येथील ग्रामस्थांना पायी चालत आसूद पुलाकडे जाऊन बस गाठावी लागते. आता या रस्त्याचे काम पूर्ण झाले असल्याने तातडीने मुरुड-कर्दे बस सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. या मार्गावर बस फेरी नसल्याने रुग्ण, विद्यार्थी आणि महिलांची मोठी गैरसोय होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 PM 25/Oct/2024

Dr amey pathak