मंडणगड : ‘समाजातील प्रत्येक शोषित व वंचित घटकांपर्यंत न्यायव्यवस्था आणि शासनाच्या विविध योजना पोहोचवणे ही आजच्या काळाची गरज आहे’, असे प्रतिपादन मंडणगडच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या न्यायाधीश अमृता जोशी यांनी केले.
तालुका विधी सेवा समिती दापोली व दिवाणी न्यायालयातर्फे तिडे-आदिवासीवाडीत कायदेशीर लोकजागृती कार्यक्रम घेण्यात आला. न्यायाधीश जोशी यांनी दुर्गम परिसरातील आदिवासी न्यायव्यवस्थेतील विविध योजनांची माहिती दिली. या वेळी तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. मिलिंद लोखंडे, गटविकास अधिकारी श्री. ए. बी. खरात, अॅड. दीपांजली धाडवे, अॅड. राकेश साळुंखे, अॅड. किरण कांबळे, अॅड. श्रीकृष्ण जाधव आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 PM 20/Nov/2025














