खेड : ३८ वर्षांनंतर खेडची नळपाणी योजना नव्याने जोडण्यात येत आहे आणि ११० कोटी खर्चुन दापोली-खेड रस्त्याचे बांधकाम सुरू होत आहे. त्यामुळे महायुतीची बांधिलकी ही विकासाशी कायम असणार असून, हा विकास साधण्यासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मतदारांना केले.
खेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त महात्मा फुले नगर, प्रभाग क्र. ५ मधील शिवसेना भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार यश राकेश खेडेकर, आरती पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभाग क्र. ६ येथील शिवसेना-भाजपा महायुती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माधवी बुटाला, नगरसेवक पदाच्या उमेदवार वैभवी खेडेकर व सतीश चिकणे यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली. यावेळी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार संजय कदम, भाजपा रत्नागिरी उत्तर जिल्हा निवडणूक समन्वयक वैभव खेडेकर, सौ. श्रेया कदम, शहर प्रमुख कुंदन सातपुते, संजय मोदी, उमेश चव्हाण आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:32 PM 27/Nov/2025














