चिपळूणमध्ये अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; कापसाळ परिसरातून गावठी हातभट्टीची दारू जप्त

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. कापसाळ टेपरवाडी येथील एका आंब्याच्या झाडाखाली चोरट्या मार्गाने गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ३१ जानेवारी २०२६ रोजी रात्री ९:०५ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

कारवाईचा तपशील आणि जप्त मुद्देमाल

चिपळूण पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कापसाळ गणेशवाडी येथील रहिवासी संदिप बबन चांदे (वय ४०) हा विनापरवाना दारू विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता, आरोपीकडे स्वतःच्या फायद्यासाठी विक्रीकरिता साठवलेली एकूण १९ लीटर गावठी हातभट्टीची दारू मिळून आली. या कारवाईत १९३० रुपये किमतीची दारू आणि ५ रुपये किमतीचा प्लास्टिक ग्लास, असा एकूण १९३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस तपास आणि गुन्हा नोंद

Tata sierra

याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस हवादार आदिनाथ एकनाथ आदावडे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी संदिप बबन चांदे याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. १ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री १२:०९ वाजता ही नोंद करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:27 02-02-2026