लांजा : इंदवटी येथील २५ कुटुंबांच्या स्थलांतराच्या हालचाली..

Jun 13, 2024 - 10:51
 0
लांजा : इंदवटी येथील २५ कुटुंबांच्या स्थलांतराच्या हालचाली..

रत्नागिरी : लांजा तालुक्यातील दरडग्रस्त आणि भूस्खलनप्रवण क्षेत्रातील इंदवटी बाईतवाडी येथील २० घरांमधील २५ कुटुंबांचे पुनर्वसन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यातील ६ कुटुंबे स्वत: हून स्थलांतरित होणार आहेत.

त्यांच्यासाठी प्रस्तावित जागेचा अहवाल देण्याची सूचना लांजा तहसीलदारांनी भूवैज्ञानिकांना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर १४ जून रोजी इंदवटी येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे.

दरम्यान, लांजा तालुक्यातील १८० कुटुंबांना सतर्कतेच्या आणि स्थलांतराच्या नोटिसा लांजा महसूल विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. वनगुळे बौद्धवाडी येथे भूस्खलनचा धोका असल्याने तेथील कुटुंबे अतिवृष्टीवेळी समाज मंदिरात रात्री स्थलांतरित होतात. दरडग्रस्त ठिकाणी नोडल अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी अतिजोखमीच्या कुटुंबांतील व्यवस्था करण्याचे प्रयोजन आहे. लांजा तालुक्यातील दरडग्रस्त गावांचे भुगर्भ शास्त्रज्ञांतर्फे सर्वेक्षण करून गावे निश्चित करण्यात आली आहेत. अतिवृष्टी जोखीम भागात खोरनिनको साईनगर मुसळेवाडी येथील २५ घरे, वनगुळे ५ घरे, इंदवटी ९, खावडी भोवडवाडी १५, गोळवशी तेलीवाडी २०, साटवली तालये वाडी, भांडार वाडी ३४, भांबेड दत्त मंदिर १, वेरवली पाथरे वाडी ११, कुरंग १३, निवसर मुस्लिम वाडी ४०, इंदवटी बाईत वाडी २, गांगरकर कोकण रेल्वे बोगद्याशेजारी ५, कोल्हेवाडी १ या ठिकाणी या कुटुंबांना सतर्कता आदेश देण्यात आले आहेत.

इंदवटी बाईत वाडी येथील कुटुंबे दुसऱ्या घरात स्थलांतर होतात. इंदवटी येथे रस्ता काम करण्यात आले आहे, तर खोरनिनको येथे धोकादायक ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. दरडग्रस्त गावात पालक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी गावातील यंत्रणा, संस्था, मंडळे यांच्या संपर्कात राहून त्यांच्या मदतीने आपत्कालीन वेळी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.लांजा तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. लांजा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष तहसीलदार प्रमोद कदम यांनी शासकीय यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 13-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow