दापोलीचा दहावीचा निकाल ९८.४२ टक्के

May 28, 2024 - 11:29
 0
दापोलीचा दहावीचा निकाल ९८.४२ टक्के


दापोली : विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून उत्कंठा लागलेल्या दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दि. २७ रोजी निकालाची घोषणा केली असून, दापोलीत दहावीचा निकाल ९८.४२ टक्के इतका लागला आहे.

तालुक्यातील ५० शाळांपैकी ३५ शाळांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे. या परीक्षेत एकूण १८३८ पैकी १८०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यातील ए. जी. हायस्कूल दापोली, ९७.६० आणि संतोषभाई मेहता हायस्कूल दापोली९७ टक्के यशस्वी ठरले आहेत. नॅशनल हायस्कूल दापोली ९७.१४ टक्के, नवलकर एल. टी. दाभोळ १०० टक्के एम. के इंग्लिश स्कूल आंजर्ले १०० टक्के, दांडेकर विद्यालय केळशी १०० टटक्के, एन. डी. गोले हायस्कूल हर्णे १०० टक्के, व्ही. के. जोशी करजगाव ९६.२९ टक्के, सानेगुरुजी विद्या मंदिर पालगड ९५.८३ टक्के, माध्यमिक शाळा माटवण १०० टक्के, एन. के वराडकर मुरुड १०० टक्के, शिवाजी हायस्कूल करंजाणी ९४.५९ टक्के, मॉडर्न हायस्कूल दाभिळ १०० टक्के, मधुरभाई बुटाला गावतळे ९८.४१ टक्के, नवभारत हायस्कूल जामगे १०० टक्के, विश्राम रामजी घोले वाकवली ९४.६६ टक्के, उर्दू हायस्कुल दाभोळ १०० टक्के, कुटरेकर माध्यमिक विद्यालय पंचनदी १०० टक्के, राजझिंग हायस्कूल जामगे १०० टक्के, दळवी हायस्कूल वेळवी ७७.७७ टक्के, विद्यामंदिर कोलथरे १०० टक्के, लोकमान्य विद्यामंदिर चिखलगाव १०० टक्के, नॅशनल हायस्कूल हर्णे १०० टक्के, बहुजन हिताय विद्यामंदिर आगरवायंगणी १०० टक्के, न्यू इंग्लिश स्कूल करंजाळी १०० टक्के, डी.एम.एस. पी. मंडळ इंग्लिश मीडियम स्कूल दापोली १०० टक्के, सरस्वती माध्यमिक विद्यालय ओणनवसे १०० टक्के, श्रीराम हायस्कूल पाजपंढरी ९३.६५ टक्के, आडे पंचक्रोशी हायस्कूल आडे १०० टक्के, विद्यामंदिर हायस्कूल उन्हवरे १०० टक्के, न्यू इंग्लिश स्कूल मांदिवली १०० टक्के, वेळवी माध्यमिक विद्यालय ९७.४३ टक्के, विरेश्वर विद्यालय विरसई १०० टक्के, यु. ए. दळवी इंग्लिश मीडियम दापोली १०० टक्के, सारंग पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय १०० टक्के, ज्ञानदीप विद्यामंदिर दापोली १०० टक्के, नॅशनल हायस्कूल मांदिवली १०० टक्के, व्ही. के. जोशी करजगाव ८७.५० टक्के, अंतुले इंग्लिश स्कूल पांगारी १०० टक्के, कन्या शाळा माध्यमिक विद्यालय दापोली ९७.२९ टक्के, न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे १०० टक्के, तेरेवायंगणी विद्यामंदिर १०० टक्के, न्यू इंग्लिश स्कूल दमामे १०० टक्के, आश्रम शाळा असोड १०० टक्के, न्यू इंग्लिश स्कूल कोळबांद्रे ९० टक्के, इंग्लिश मीडियम स्कूल दाभोळ १०० टक्के, बुरोंडकर हायस्कूल दापोली १०० टक्के, संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम १०० टक्के, कौसर हसन इंग्लिश मीडियम स्कूल दाभोळ १०० टक्के निकाल लागला आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 28-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow