चक्रीवादळ 'रेमल'ची प. बंगालमध्ये धडक..; अंदाजे ११०-१२० किमी प्रतितास वेग

May 27, 2024 - 12:17
 0
चक्रीवादळ 'रेमल'ची प. बंगालमध्ये धडक..; अंदाजे ११०-१२० किमी प्रतितास वेग

कोलकाता : तीव्र चक्रीवादळ 'रेमल' रविवारी मध्यरात्री पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर भागावर अंदाजे ११०-१२० किमी प्रतितास वेगाने धडकले. चक्रीवादळामुळे किनारपट्टी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला.

तसेच राजधानी कोलकाता आणि त्याच्या लगतच्याही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारतीय हवामान विभागाचे माजी क्षेत्रीय प्रमुख सोमनाथ दत्ता यांनी सांगितले की, २०२० साली आलेल्या चक्रीवादळ अम्फानपेक्षा रेमलमुळे कमी नुकसान होईल.

एक लाखाहून अधिक लोक स्थलांतरित

खबरदारीचा उपाय म्हणून, बंगाल सरकारने सुंदरबन आणि सागर बेटांसह किनारपट्टी भागातील सुमारे १ लाखाहून अधिक लोकांना सुरक्षित आश्रयस्थानी हलवले आहे.

पारा ४६ पार; जळगाव, अकोल्यात कलम १४४

जळगाव/अकोला/नागपूर : राज्यात उष्णतेच्या लाटेमुळे तापमानाचा पारा ४५ पार झाल्याने जळगाव आणि अकोला जिल्ह्यांत ३१ मेपर्यंत कलम १४४ लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून काढण्यात आले आहेत. उन्हासाठी अशाप्रकारची प्रतिबंधात्मक उपाययोजना होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी.

यवतमाळमध्ये पारा ४६.६ अंशांवर

यवतमाळमध्ये पारा ४६.६ अंशावर उसळला असून, ही ३५ वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बराेबरी आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील सोनोरी येथील शेख अश्फाक शेख भुरू (३८) यांचा मृतदेह शनिवारी सायंकाळी आढळला. त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे समजते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 27-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow