देवरूखमध्ये दूरध्वनी खांबांना रानवेलींचा विळखा

Jun 14, 2024 - 15:00
 0
देवरूखमध्ये दूरध्वनी खांबांना रानवेलींचा विळखा

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे येथील नरुद्दिन डावे मुस्लिम वाडी येथील विश्रांती स्थळाजवळील भारत संचार निगम लिमिटेड यांचे अनेक वर्षे दुर्लक्ष झाल्याने झाडाच्या फांद्यांनी पोल वेढले आहेत. 

याच गावातील धोंडू मामु स्टॉप फणसवणे येथे ही झाडाच्या विळख्यात पोल अडकल्याने नेटचे व वाय फायचे प्रश्न उद्भवत आहेत. त्यामुळे तेथील रहिवाशांना नाहक त्रास होत आहे. 

पावसाळा आला असूनही अधिकारी वर्ग सुस्त असून असे अनेक ठिकाणी पोलांचा व नेटचा प्रश्न ऐरणीवर आहेत. याकडे दुर्लक्ष केल्यास नागरिकांनी १५ ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे. संबंधित विभागाने त्वरित लक्ष घालून या समस्येवर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते फाईक दावे फणसवणे यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:00 14-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow