लांजा : कोर्लेत खवले मांजराला जीवदान
लांजा : लांजा तालुक्यातील कोर्ले येथे एका विहिरीत अडकलेल्या खवले मांजराला जीवदान देण्यात वनविभागाला यश आले आहे.
वनविभागाने या खवले मांजराला सुरक्षित विहिरीबाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडले. लांजा तालुक्यातील कोर्ले येथील शेतकरी सुधाकर गोपाळ कांबळे यांच्या काजूबागेच्या विहिरीत खवले मांजर असल्याचे बुधवारी (ता. १२) आढळले. वनाधिकारी दिलीप आरेकर आणि वनरक्षक कांबळे, पवार आणि वनमित्र अमित लांजेकर यांनी विहिरीत पडलेल्या खवले मांजराला सायंकाळी उशिरा सुरक्षितपणे बाहेर काढले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:00 14-06-2024
What's Your Reaction?