गुहागर : धोपावे, पाटपन्हाळेतील नळ पाणी योजनांसमोर अडथळे

Jun 19, 2024 - 11:55
Jun 19, 2024 - 16:00
 0
गुहागर : धोपावे, पाटपन्हाळेतील नळ पाणी योजनांसमोर अडथळे

गुहागर :  जीवन प्राधिकरणातून मंजूर झालेली तालुक्यातील धोपावे येथील नळ पाणी योजना व जलजीवन मिशन योजनेतून मंजूर झालेली पाटपन्हाळे पाणी योजना या दोन्ही योजनांची जलवाहिनी मोडकाघर जलायशयातून नेण्यात येत आहे. यापैकी नियोजित वेळेत सुरू केलेल्या धोपावे योजनेच्या जलवाहिनीचे काम शृंगारतळी दरम्यान थांबले आहे. महामार्गाच्या बाजूने नव्याने बांधण्यात आलेली गटारे, पेव्हर ब्लॉक यामुळे या जलवाहिनीचे काम करताना ठेकेदाराला अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे.

दीड हजार लोकसंख्या असलेल्या धोपावे गावाला दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची मोठी झळ पडते. येथील काही वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. या गावाची पाण्याची गरज लक्षात घेऊन या गावासाठी जीवन प्राधिकरण योजनेतून सुमारे ४ कोटी ७० लाखाची योजना मंजूर झाली. धोपावेत जलस्रोत नसल्याने शृंगारतळी-गुहागर मोडकाघर जलवाहिनीद्वारे मार्गावरील जलाशयातून पाणी नेण्याचे प्रस्तावित झाले. त्यानुसार या योजनेच्या कामाला ठेकेदाराने सुरुवातही केली. ही योजना जुलै महिन्याअखेर पूर्ण करावयाची असल्याने ठेकेदारानेही जोमाने काम सुरु केले. ही जलवाहिनी मोडका आगर जलाशयातून पाटपन्हाळे, शृंगारतळी, पालपेणे, पवारसाखरीमार्गे धोपावेत जाणार आहे.

या जलवाहिनीचे काम शृंगारतळीच्या अलिकडे म्हणजे आठवडा बाजार भरतो तेथील पुलापर्यंत झाले आहे. गुहागर-विजापूर महामार्ग रुंदीकरणात शृंगारतळीत रस्ता रुंदीकरण होऊन दोन्ही बाजूने काँक्रीटची गटारे व पेव्हर ब्लॉकही टाकण्यात आले. त्यामुळे जलवाहिनीला ही बांधकामे अडसर ठरणार आहेत. रस्त्यालगत वस्ती, दुकाने, टपऱ्या आहेत. अलिकडे गटारांवरही काही बांधकामांनी गर्दी केलेली आहे. त्यामुळे शृंगारतळीत अडकललेल्या धोपावे जलवाहिनीला अनेक अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागणार आहे.
 
पाटपन्हाळे ग्रा. पं.ची योजना बारगळली
पाटपन्हाळे गावची जलजीवन मिशन योजना अजूनही बारगळलेलीच आहे. या योजनेची जलवाहिनीही मोडकाघर जलाशयातूनच येणार आहे. मोडकाघर जलाशयाच्या अवघ्या काही अंतरावर असलेले पाटपन्हाळे ग्रा.पं. अजूनही करण्यास सपशेल अपयशी ठरली आहे. वास्तविक दोन्ही गावांच्या योजनेची जलवाहिनी एकाच मार्गाने एकाचवेळी आणण्यास हरकत नव्हती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:22 PM 19/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow