आरजू टेकसोल : गल्ली ते दिल्ली; चुना लावण्यात स्थानिकांचा पुढाकार

May 27, 2024 - 12:44
 0
आरजू टेकसोल : गल्ली ते दिल्ली; चुना लावण्यात स्थानिकांचा पुढाकार

रत्नागिरी : परजिल्ह्यातील व्यक्तींनी स्थानिकांना फसवल्याचा आजवर रत्नागिरीच्या बाबत इतिहास होता. आता मात्र आरजू टेकसोल च्या माध्यमातून स्थानिकांनीच स्थानिकांना चुना लावल्याचे समोर येत आहे. आरजू कंपनीचे गुन्हा दाखल झालेले संचालक जरी स्थानिक असले तर त्यांच्या कार्याची व्याप्ती दिल्लीपर्यंत असल्याचे पोलीस तपासात पुढे येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

रोजगार देतो असे सांगत लाखो रुपये घेत अनेकांची फसवणूक केल्याची बातमी सुमारे महिनाभरापूर्वी रत्नागिरी खबरदार मधून प्रसिद्ध झाली होती. मात्र या कंपनीचे संचालक आपले पैसे परत करतील या आशेवर अनेकजण पोलिसात तक्रार द्यायला पुढे येत नव्हते. काल अखेर एका गुंतवणूकदाराने पुढे येत आपली १८ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार ग्रामीण पोलिसात स्थानकात दिली आहे. या तक्रारी नुसार आरजू टेक्सोल कंपनीचे प्रसाद शशिकांत फडके रा. गावखडी, संजय विश्वनाथ सावंत, संजय गोविंद केळकर, अनि उर्फ अमर महादेव जाधव यांच्यावर भा.दं.सं.क. ४०६,४२०,३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३,४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यवसाय संधीसोबत गुंतवलेल्या रकमेवर भरभक्कम परतावा देतो, असे आमिष दाखवत हजारो रत्नागिरीकरांना चुना लावणाऱ्या आरजू टेक्सोल कंपनीची व्याप्ती थेट दिल्लीपर्यंत असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. रत्नागिरीप्रमाणे दिल्लीतही आरजी टेक्सोलचे गोदाम असून, तिथेही अशाच प्रकारे फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. रत्नागिरीतील गुंतवणूकदारांची संख्या ८५१ वर जाईल, अशी शक्यता आहे.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:11 27-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow