लांजा : खोरनिनको धरण, मुचकुंद ऋषींच्या गुहेची पर्यटकांना भुरळ..

Jun 19, 2024 - 16:35
Jun 19, 2024 - 16:38
 0
लांजा : खोरनिनको धरण, मुचकुंद ऋषींच्या गुहेची पर्यटकांना भुरळ..

लांजा : निर्सगाने नटलेला प्रदेश आणि थंड हवेचे ठिकाण असल्याने लांजा तालुका मिनी महाबळेश्वर म्हणून नावारूपाला येत आहे. तालुक्यातील खोरनिनको येथील मानवनिर्मित धरण, जावडे येथील एकखांबी गणपती मंदिर आणि मुचकुंद ऋषी यांची गुहा पर्यटकांना भुरळ घालत असून पावसाळ्यातील पर्यटनाला चालना मिळते.

माचाळ हे गाव निर्सगाच्या सानिध्यात सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगांवर वसलेले आहे. लांजा मुंबई-गोवा महामार्गावरून कोर्लेमार्ग कोचरी किंवा तळवडे मार्ग दाभोळे-शिपोशी कोचरी मार्ग माचाळ येथे जाण्यासाठी रस्ता आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या स्थळाचा "ब" वर्ग पर्यटनस्थळात समावेश केला आहे. माचाळच्या समोरच इतिहासातील प्रसिद्ध विशाळगड मोठ्या दिमाखात उभा आहे. या मिनी महाबळेश्वरला भेट देण्याचा मोह पर्यटकांना आवरत नाही. माचाळ येथे जातानाच प्रथम मुचकुंद ऋषी यांची गुहा आहे. या मुचकुंद ऋषी गुहेबद्दल एक पौराणिक आख्यायिका आहे.

त्या ठिकाणी माचाळच्या ग्रामस्थ मंडळींनी सुंदर मंदिरही बांधलेले आहे. त्याचबरोबर या परिसरात खोरनिनको धरण आणि त्यावरचा मानवनिर्मित धबधबा हे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण असते. तेथील निसर्गसौंदर्य आणि शांतता पर्यटकांना खिळवून टाकते. येथील कौशल्याने बांधलेल्या पायऱ्यांवरून वाहणारे पाणी नजरबंदी करते. हे धरण चारीबाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे आणि पावसाळ्यात येथील दृश्य विलोभनीय आहे. या धरणाला दरवाजे नाहीत. जेव्हा धरण पूर्ण भरते तेव्हा त्यातील पाणी वैशिष्ट्यपूर्ण पाय-यांसारख्या रचनेमुळे शांतपणे खाली वाहात येते, असा हा खोरनिनको धबधबा आहे. या धबधब्यात पर्यटक आंघोळ करण्यासाठी पावसाळ्यात हजेरी लावतात. जवळच जावडे येथे शिंदे कुटुंबीयांनी घरासमोर एक खांबावर टुमदार असे गणपतीचे मंदिर साकारले आहे. एका खांबावर बांधण्यात आलेल्या हे मंदिर पाहण्यासाठी पर्यटक हजेरी लावतात तसेच प्रभानवल्ली येथील गणेशखोरी डोंगरपठारावर श्री बल्लाळ गणेशाचे मंदिर आहे. येथे भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. त्यामुळे पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी होते.

माचाळ हे गाव थंड हवेचे ठिकाण असून, हे गाव जगाच्या नकाशावर आणण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने आपण प्रयत्न केले गेले त्याचे फळ आता दिसू लागले आहे. - विवेक सावंत, लांजा

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:03 PM 19/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow