दापोलीतील गुरूकृपा कात फॅक्टरीवर सांगोला वन विभागाची धाड

May 31, 2024 - 12:06
 0
दापोलीतील गुरूकृपा कात फॅक्टरीवर सांगोला वन विभागाची धाड

चिपळूण : सांगोला येथील वन विभागाच्या पथकाने दापोली येथील एका कात फॅक्टरीवर छापा टाकून ३०० खैराच्या लाकडाचे ओंडके जप्त केले आहेत. 

याप्रकरणी सांगोला येथील दत्तात्रय शिवाजी गोडसे व मारुती विलास गळवे तसेच विसापूर (ता. दापोली) येथील गुरूकृपा कात इंडस्ट्रीजचे नीलेश शिरोडकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

सांगोला येथील वनक्षेत्रातील खैराच्या झाडांची तोड करून विना परवाना हे लाकूड दापोली येथील खैराच्या कात फॅक्टरीमध्ये आणण्यात आले होते. या बाबत वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेले दोन दिवस या प्रकरणी सांगोला आणि रत्नागिरी येथील वन विभागामार्फत कारवाई सुरू होती. सांगोला येथून दापोली येथील कात फॅक्टरीत बेकायदा खैराची तोड करून विनापरवाना वाहतूक करून खैराचे लाकूड आणल्याचा संशय वन विभागाला होता. त्यानुसार सांगोला येथील वन विभागाच्या पथकाने विसापूर (ता. दापोली) येथे गुरूकृपा कात फॅक्टरीवर छापा टाकून ही धडक कारवाई केली आहे व खैर लाकडाची तस्करी उघडकीस आणली आहे. या प्रकरणी एक मोटारसायकल, खैर लाकूड व कटर देखील जप्त करण्यात आला आहे. सांगोला तालुक्यातील वन क्षेत्रात रात्री गस्त घालत असताना शनिवार दि. २५ मे रोजी राखीव वनक्षेत्रात खैर झाडांची तोड होत असल्याचे आढळून आले. यावेळी खैराची झाडे तोडणारे दोघेजण वन विभागाच्या तावडीतून पसार झाले. त्यानंतर त्यांचा पाठलाग करून वनविभागाने पकडले. अधिक तपास केला असता खैराची झाडे तोडून दापोली येथील कात फॅक्टरीला खैर पुरवला जात असल्याचे तपासात उघड झाले. त्यानुसार सांगोला वन विभागाने दापोलीतील कात फॅक्टरीवर धाड टाकली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 31-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow