रत्नागिरीतील नवीन भाजी मार्केटमधील गाळेधारकांना न.प.कडून नोटीस; गाळेधारकांची न्यायालयात धाव

Jun 17, 2024 - 10:21
Jun 17, 2024 - 10:23
 0
रत्नागिरीतील नवीन भाजी मार्केटमधील गाळेधारकांना न.प.कडून नोटीस; गाळेधारकांची न्यायालयात धाव

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेने नवीन भाजी मार्केटच्या धोकादायक इमारतीतील आतील, बाहेरील सर्व गाळेधारकांना नोटीस बजावून गाळे रिकामे करण्याची नोटीस बजावली. या नोटीस विरुद्ध गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेवून नोटीसला स्थगिती देण्याची विनंती केली आहे. जुनी भाजी मार्केटची इमारत रत्नागिरी नगर परिषदेच्या मालकीची आहे. 

स्ट्रक्चरल ऑडीटमध्ये ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल आल्यानंतर सर्व गाळेधारकांना आपापले गाळे खाली करून रनपच्या ताब्यात देण्याची नोटीस दिली. गाळे धारकांच्या कराराची मुदत संपलेली नसल्याने त्या नोटीसविरुद्ध काही वर्षांपूर्वी न्यायालयात दाद मागितली आहे.

न्यायालयात प्रलंबित प्रकरणी न्यायालयात अंतिम युक्तीवाद होणे शिल्लक आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर पुन्हा न.प.ने नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनांतर्गत खबरदारी म्हणून गाळेधारकांना पुन्हा नोटीस बजावली आहे. भाजी मार्केटची इमारत धोकादायक झाली असून ती पडण्याची भीती आहे. त्यामुळे गाळे रिकामे करून घ्यावे. नोटीसनुसार कारवाई न झाल्यास कोणतीही दुर्घटना घडल्यास होणाऱ्या जीवित व वित्तहानीस संबंधित गाळेधारक जबाबदार असतील, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. नोटीसलाच स्थगिती मिळावी यासाठी गाळेधारक न्यायालयात गेले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 AM 17/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow