माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र च्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी ची बैठक संपन्न

Jun 17, 2024 - 11:13
 0
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र च्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी ची बैठक संपन्न

रत्नागिरी : ( देवरुख) माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य च्या रत्नागिरी जिल्ह्याची कार्यकारणी बैठक देवरूख येथे संपन्न झाली.

महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, सभेच्या पुढील कामकाजाला सुरुवात केली. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि मार्गदर्शक माहिती अधिकार महासंघाचे राज्य सचिव सन्मा.सामीर शिरवडकर यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे माहिती अधिकार कोकण उपाध्यक्ष निकम सर, रत्नागिरी जिल्ह्या अध्यक्ष मनोहर गुरव सर, कार्याध्यक्ष रमजान भाई गोलंदाज सर, जिल्हा उपाध्यक्ष बोटले सर, चिपळूण चे योगेश जी पेढामकर सर यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रबरोबर नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष, संगमेश्वर तालूका अध्यक्ष, नवनिर्वाचित सद्स्य यांचा ही सन्मान करण्यात आला.

पस्थितीताना संबोधित करताना अनेक मान्यवरांनी माहिती अधिकार आणि प्रशासन यातील फरक सांगत आपण, कशी माहिती उपलब्ध करून ती लोकांसाठी उपलब्ध करून देऊ शकतो, जेणेकरून त्यांना न्याय मिळून त्यांच्यावरील  होणाऱ्या अन्याया विरुद्ध आपण अवाज उठवू शकतो. माहिती अधिकार अधिनियम २००५ कलम १ ते ३१ च्या नियमाचा स्पष्टीकरण करून, कार्यकर्त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. त्या समस्येवर उपाय माहिती अधिकार मध्ये काय आणि कसे या बाबी स्पष्ट केल्या. ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसील, उपविभागीय कार्यलय, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी या सर्व प्रशासकीय यंत्रणेला कस जागग करता येईल यावर सखोल चर्चा करण्यात आली. लवकरच प्रत्येक तालुकानिहाय बैठकीचे नियोजन करण्याचे ठरले.

या बैठकीत रमजान भाई गोलंदाज, ( पत्रकार) ,योगेश पेढामकर ( शिक्षक), खेडेकर ( वकील), निकम सर( ग्राहक संरक्षन), बोटले सर ( शिक्षक) अश्या अनेक मान्यवरांनी माहिती अधिकार बद्दल आपले विचार मांडले. माहिती अधिकार महासंघ महाराष्ट्र राज्याचे सचिव समीर शिरवडकर यांनी अपल्या अध्यक्षीय भाषणांत माहिती अधिकार अधिनियम २००५ कलम १ ते ३१ बाबत मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांच्या  समस्या एकूण त्यावर समर्पक उत्तरे दिली आणि एक संघटित होऊन काम करू, आणि माहिती अधिकार महासंघ च नाव मोठं करू, असे अवाहन केले. या बैठकीला रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी मोठया प्रमाणात उपस्थित होते. उपस्थितीतांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 17-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow