भजन ही भगवंताशी एकरूप होण्याची कला : विश्वनाथ भाटे

Jun 17, 2024 - 14:53
 0
भजन ही भगवंताशी एकरूप होण्याची कला : विश्वनाथ भाटे

त्नागिरी : भजन ही भगवंताशी एकरूप होण्याची कला असून संत नामदेव महाराज भजनात दंग होऊन पांडुरंगाशी बोलत असत. भजनी कलावंताने अभंग गवळण, भारूड, गजर या भजनी कलेतून परमेश्वराशी एकरूप होण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन प्रसिद्ध भजनी बुवा विश्वनाथ भाटे यांनी केले.

रत्नागिरी येथील श्रीराम मंदिरात श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या वतीने मासिक भजनी कलावंत मार्गदर्शन मेळावा उत्साहाने झाला. त्यावेळी बुवा भाटे यांनी विविध भजने सादर करून राम कृष्ण हरी या गजराने भजनाची सांगता करताना भजनी कलावंतांना आषाढी वारीला गेल्याचा आनंद मिळवून दिला.

यावेळी भजनी कलावंत बाळाजी घोसाळकर, सौ. शुभदा आगाशे, सुरेंद्र घुडे, सचिन टिळेकर, राजन भाटकर, शिवराम कदम, समीक्षा वालम, अर्चना विलणकर, सुधीर वायंगणकर, रमाकांत पांचाळ यांनी भजनी कला सादर केल्या. त्यांना मृदंग साथ राजन साळवी व दत्ताराम लिंगायत यांनी केली, तर टाळ साथ राजन भाटकर आणि चकवा साथ रमाकांत पांचाळ यांनी केली.श्रीराम मंदिर कट्ट्याचे मुख्य संयोजक सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या भजनी मेळाव्याला दत्तप्रसाद गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढील भजनी मेळावा शनिवार दिनांक २७ जुलै रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:21 17-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow