राज्यातील धरणे कोरडीच !

Jun 17, 2024 - 14:49
 0
राज्यातील धरणे कोरडीच !

पुणे : राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. त्याचबरोबर मान्सूनचे देखील वेळेवर आगमन झाले. मान्सूनचा पाऊसही जोरदार बरसला. तरीदेखील 'जलसंपदा'च्या सहाही विभागांतील बहुतांश धरणांतील पाणीसाठा शून्य टक्क्यांच्याही खाली आहे. ५० हुन अधिक धरणांतील पाण्याने तळ गाठला आहे. यात बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, बुलढाणा जिल्ह्यातील धरणांचा समावेश आहे.

मे महिन्यात अवकाळी जोरदार बरसल, मात्र त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढण्यास फारशी मदत झाली नाही. आता मात्र, मान्सूनच्या पावसावरच सर्व धरणांची मदार आहे. अजूनही उन्हाचा चटका कायम असल्यामुळे धरणांमधील पाणीसाठा अतिशय वेगाने कमी होत आहे. सध्या राज्यातील सर्वच धरणांमध्ये केवळ २०.२४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच महिन्यात २८.२१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुमारे ८ टक्क्यांनी पाणीसाठा कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. एकूणच पाण्याची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. धरणांमधील पाण्याचे व्यवस्थापन व्यवस्थित करणे गरजेचे आहे. अन्यथा भीषण पाणीटंचाई' स्थितीला तोंड देण्याची वेळ राज्यावर येण्याची शक्यता आहे.

जलसंपदा विभागाच्या अंतर्गत नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोकण असे सहा विभाग आहेत. या सहा विभागांत मिळून एकूण २ हजार ९९४ एवढी धरणे आहेत.

.. तर वाढेल धरणांतील पाणीसाठा !
राज्यात मान्सून वेळेवर पोहोचला आहे. त्यानुसार मान्सूनचा पाऊसही बरसला आहे; मात्र बरसलेला पाऊस अत्यंत कमी आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठा वाढण्यास मदत झालेली नाही. राज्यात दरवर्षीच जून महिन्यात मान्सूनचा पाऊस कमीच पडत असल्याचे चित्र मागील काही वर्षांपासून दिसत आहे. जुलैपासून चांगला पाऊस पडण्यास सुरुवात होते. यावर्षी हवामान विभागाने १०६ टक्के पाऊस देशासह राज्यातही पडेल, असा अंदाज वर्तविला आहे. या अंदाजानुसार पाऊस बरसला तर धरणांमध्ये पाणीसाठा वाढण्याचा अंदाज आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:16 PM 17/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow