रत्नागिरी : जि. प. अधिकाऱ्यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

Jun 18, 2024 - 11:47
Jun 18, 2024 - 11:49
 0
रत्नागिरी : जि. प. अधिकाऱ्यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

रत्नागिरी : नव्या शैक्षणिक वर्षाला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या अडीच हजार शाळांची घंटा खणखणली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार यांनी पहिल्या दिवशी शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी हितगुज केले. त्याचबरोबर जि.प.च्या सर्व विभागप्रमुखांनी शाळांना भेटी दिली. 

शनिवारी नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. जि. प. ने यावर्षी अधिकाऱ्यांची भेट शाळेला हा उपक्रम राबविला. त्यानुसार प्रत्येक विभागाच्या विभागप्रमुखांनी एका शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये ग्रा.पं.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई, मुख्य लेखायुक्त अधिकारी उत्तम सुर्वे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा समाजकल्याण अधिकारी जे. पी. जाधव, महिला बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे, ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या कार्यकारी अभियंता मयुरी पाटील, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मानसिंग पाटील, तसेच कार्यकारी अभियंता अक्षय बोरसे, पशुसंवर्धन अधिकारी अजय शेंडे, शिक्षणाधिकारी बी. एम. कासार यांचा समावेश होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार यांनीसुद्धा शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी जि. प. शाळा कुवारबाव महालक्ष्मी नगर येथे भेट दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 18/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow