महावितरण उपविभाग गुहागर कार्यालयावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गुहागर शहर यांची धडक

May 27, 2024 - 14:35
 0
महावितरण उपविभाग गुहागर कार्यालयावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गुहागर शहर यांची धडक

गुहागर : गुहागर बाजारपेठ सोनारवाडी जुने मच्छी मार्केट येथे ११ के वी लाईन वरती वी क्रॉस हा चुकीच्या पद्धतीने बांधून घेतलेला आहे पावसाळ्यामध्ये तिथे अपघात होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता आपण त्याचा मेंटेनन्स त्वरित करावा व त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी. तसेच गुहागर शहरामध्ये साधारण आठवडाभर वोल्टेज हे कमी प्रमाणात येत आहे याचा त्रास सर्वसामान्य जनतेला बाजारपेठे मधील व्यवसायिकांना हॉटेल व्यवसायिकांना होत आहे याच्याकडे देखील तात्काळ लक्ष द्यावे व वीज पुरवठा हा सुरळीत व्हावा हे निवेदन आज गुहागर शहर शिवसेना तर्फे देण्यात आले.

यावेळी शहर प्रमुख श्री.सिद्धिविनायक जाधव, शिवसेना उपतालुकाप्रमुख श्री.जयदेव मोरे, युवासेना शहरप्रमुख राज विखारे, युवती सेना प्रमुख, सौ.रूणाली बागकर, महिला उपशहर संघटिका श्रीमती प्रीती ताई वराडकर, विभाग प्रमुख श्री. विलास नार्वेकर, श्री.संतोष गुहागरकर, श्री.समीर कानगुटकर, शाखाप्रमुख श्री.कल्पेश बागकर, शिवसेना ग्राहक कक्ष तालुकाध्यक्ष श्री.आदेश मोरे, ज्येष्ठ शिवसैनिक श्री प्रभुनाथ देवळेकर, शिवसैनिक श्री.निखिल विखारे, श्री.महेश जी घाडगे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:04 27-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow