महापारेषणची 2500 पदांसाठीची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात रद्द, उमेदवारांत संतापाची लाट

Jun 18, 2024 - 15:41
 0
महापारेषणची 2500 पदांसाठीची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात रद्द, उमेदवारांत संतापाची लाट

मुंबई : वेगवेगळ्या पदांसाठ ची जवळपास 80 टक्के परीक्षा प्रक्रिया पूर्ण झालेली असताना अचानक सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषणने (महापारेषण) मध्येच संपूर्ण परीक्षा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे परीक्षार्थी विद्यर्थ्यांचा संताप उफाळून आला आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांनी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मात्र विद्यर्थ्यांचे समाधान झालेले नाही.

2 हजार 541 पदांसाठी होणार होती भरती

महापारेषण अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 2 हजार 541 पदांच्या भरतीसाठी भरती 2023 साली जाहीर झाली होती. त्यानुसार मोठ्या संख्येने इच्छुक पात्र उमेदवारांनी 10 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज केले होते. दरम्यान आरक्षण स्थितीची पुनर्गणना केल्यानंतर, कंपनीकडून नवीन जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे कंपनीचे स्पष्ट केले आहे. मात्र ही आपली फसवणूक असल्याचे परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या भावना आहेत.

जाहिरातीचा दिनांक व रद्द झालेली परीक्षा

4-10-2023 कार्यकारी अभियंता

4-10-2023 अतिरिक्त कार्यकारी अभियंता

4-10-2023 उपकार्यकारी अभियंता

4-10-2023 सहाय्यक अभियंता (दूरसंचार)

4-10-2023 सहाय्यक अभियंता

20-11-2023 वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली)

20-11-2023 तंत्रज्ञ- १

20-11-2023 तंत्रज्ञ- २

20-11-2023 विद्युत सहाय्यक (पारेषण, कंत्राटी)

19-1-2024 सहाय्यक अभियंता

31-1-2024 वरिष्ठ तंत्रज्ञ

31-1-2024 तंत्रज्ञ- १

31-1-2024 तंत्रज्ञ- २

दरम्यान, ऐनवेळी भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्यामुळे परिक्षार्थी विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय. त्यामुळे आता सरकार यावर काय भूमिका घेणार? यावर काही तोडगा काढला जाणार का? तोडगा काढलाच तर तो काय असेल, असे विचारले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:20 18-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow