रत्नागिरी : आजारांबाबत जनजागृतींवर भर द्या; जिल्हाधिकाऱ्यांच्या आरोग्य विभागाला सूचना

Jun 18, 2024 - 17:06
Jun 18, 2024 - 17:31
 0
रत्नागिरी : आजारांबाबत जनजागृतींवर भर द्या; जिल्हाधिकाऱ्यांच्या आरोग्य विभागाला सूचना

रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा मोहीम सुरू आहे. २१ जून पर्यंत ही मोहिम चालणार असून जिल्हावासियांनी आपल्या आरोग्याची वेळीच काळजी घ्यावी. आरोग्य विभागानेसुद्धा जनजागृतीवर भर द्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा बाबत सुकाणू समिती सभा तसेच जिल्हा क्षयरोग फोरम मिटिंग नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेण्यात आली. विशेष अतिसार नियंत्रण मोहीम तसेच क्षयरोग अंतर्गत कामाचा आढावा घेऊन अतिसार व क्षयरोग यासारख्या आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून आकाशवाणीसारख्या वेगवेगळ्या सामाजिक माध्यमांद्वारे जास्तीत जास्त प्रमाणात प्रसिद्धी करून जनतेपर्यंत कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागातील अधिकारी यांना दिल्या.

 या सभेत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या कामाबाबत जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. पल्लवी पगडाल यांनी तसेच क्षयरोग कार्यक्रम सध्यस्थिती व त्याअंतर्गत राबवत असलेल्या योजन बाबत अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी माहितं दिली. या बैठकीला जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकीरण पूजार, जिल्हा आरोग्य अधिकार्र डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्ह रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट, आय एम. ए. अध्यक्ष डॉ. अतुल ढगे, डेरवण् वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. अमेर परांजपे आदी उपस्थित होते.

स्वतःबरोबर कुटुंबाची काळजी घ्या
आजार टाळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये व तसेच चांगल्या आरोग्यदायी सवयी आत्मसात करून प्रत्येकाने स्वतः बरोबर आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी व होणाऱ्या आजारांना प्रतिबंध करावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेला केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow