चिपळूण : शिवाजीनगर बसस्थानकाच्या काँक्रिटीकरणाचे काम ९० टक्के पूर्ण

Jun 18, 2024 - 15:57
 0
चिपळूण : शिवाजीनगर बसस्थानकाच्या काँक्रिटीकरणाचे काम ९० टक्के पूर्ण

चिपळूण : शहरातील शिवाजीनगर येथील एस. टी. महामंडळाच्या बसस्थानकातील काँक्रिटीकरणाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे महामार्गालगतच्या या बसस्थानकाला नवा लूक मिळणार आहे.

चिपळुणातील शिवाजीनगर बसस्थानक मुंबई ते गोवा दरम्यानचे महत्त्वाचे बसस्थानक आहे. या ठिकाणी चोवीस तास एसटी गाड्यांची ये-जा सुरू असते. त्यामुळे हे स्थानक चोवीस तास सुरू असते. गेली अनेक वर्षे या ठिकाणी धुळीचे साम्राज्य होते. सुरुवातीला केलेले डांबरीकरण उखडल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. पावसाळ्यात तर या स्थानकात गाडीतून उतरणे शक्य होत नव्हते. मात्र, आता काँक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असल्याने यावर्षीच्या गणेशोत्सवात चाकरमान्यांसाठी शिवाजीनगर बसस्थानक नव्याने सज्ज होत आहे.

या स्थानकातून पुणे, मुंबई, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एस.टी. सेवा सुरू असते. या शिवाय विद्यार्थ्यांची देखील मोठी गर्दी असते. चिपळूणमध्ये एसटी महामंडळाची दोन मोठी बसस्थानके आहेत. शहरामध्ये मध्यवर्ती एसटी स्थानक तर महामार्गालगत शिवाजीनगर बसस्थानक असून, बाजारपेठेमध्ये छोटेखानी जुने बसस्थानक आहे. मध्यवर्ती एसटी स्टॅण्डलगत महामंडळाची कार्यशाळा देखील आहे तर शिवाजीनगर येथे फक्त बसस्थानक असून या ठिकाणी एसर्ट महामंडळाने कंडक्टर ड्रायव्हरसाठी मोठे निवारा केंद्र उभारले आहे. चिपळूण हे 'क्रू असल्याने या ठिकाणी चालक- वाहक बदलले जातात त्यामुळे शिवाजीनगर बसस्थानकाचे महत्त्व आहे. आता हा परिसर पूर्ण काँक्रीटीकरण होत असल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.

लवकरच इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट
लवकरच एस.टी. महामंडळ इलेक्ट्रिक बसगाड्या आणणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात १३३ इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. त्यासाठी जिल्हाभरात चार चार्जिंग पॉईंट उभारले जाणार आहेत. यामध्ये शहरातील शिवाजीनगर बसस्थानकाचा समावेश आहे. त्या दृष्टीने या बसस्थानकाचे सर्वेक्षणदेखील करण्यात आले आहे. कॉंक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी चार्जिंग केंद्र उभारले जाणार आहे. त्यामुळे शिवाजीनगर बसस्थानकाला नवा लूक मिळणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:25 PM 18/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow