पावसाळ्यात आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास रत्नागिरी शहरात वाजणार भोंगा

Jun 19, 2024 - 10:35
 0
पावसाळ्यात आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास रत्नागिरी शहरात वाजणार भोंगा

रत्नागिरी : पावसाळ्यातील आपत्कालीन व्यवस्थेसाठी रत्नागिरी नगरपरिषदेने सज्जता ठेवली आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास शहरवासीयांना सावधानतेचा इशारा देणारा भोंगा वाजवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचवेळी ही परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.

रत्नागिरीत पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीची गंभीरता कमी व्हावी, यासाठी मान्सूनपूर्व नालेसफाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर रस्त्यांवरील खड्डे ही भरण्यात आले आहेत. प्राथमिक उपचारासाठी नगरपरिषदेचा दवाखाना औषधांसह सज्ज आहे. पुरेशी स्वच्छता, पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचीसुद्धा तयारी आहे. शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी शुद्धीकरणासाठी आवश्यक औषधांचा साठाही करून ठेवण्यात आला आहे. विहिरींमधील पाणी शुद्ध करण्याचे औषधही टाकले जात आहे.

पावसाळ्यात झाडे पडल्यास किंवा दरड कोसळल्यास हे अडथळे त्वरित दूर व्हावेत, यासाठी सज्जता आहे. नळाने पाणीपुरवठा होण्यास अडथळा येईल, तेव्हा टँकरने पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पावसाच्या पाण्याने कचरा, चिखल आल्यास तोही उचलण्यासाठी कामगार, कचरा गाड्या ठेवण्यात आल्या आहेत. चिखल, कचऱ्याच्या ठिकाणी जंतुनाशके फवारण्याचीही सोय केली आहे. रत्नागिरी न. प.च्या जेसीबीसह सर्व वाहनांची व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 19-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow