खेड : बॅगलेस सॅटर्डे उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दिले बियाणे पेरणीचे धडे

Jun 19, 2024 - 10:26
 0
खेड :  बॅगलेस सॅटर्डे  उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दिले बियाणे पेरणीचे धडे

लोटे : खेड तालुक्यातील शिवस्वराज्य शिक्षण प्रसारक मंडळ आवाशी संचालित हिंदवी गर्जना इंग्लिश मीडियम स्कूल येथे बॅगलेस सॅटर्डे या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना बियाणे पेरणीचे धडे देण्यात आले. याचबरोबर जमीन खणण्यापासून ते वाफे तयार करणे, बियाणे रुजवणे इत्यादी टप्प्यांमध्ये बियाणाचा जीवन प्रवास कसा असतो हे प्रात्यक्षिकांद्वारे समजावून सांगण्यात आले. 

शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील व्यवहारज्ञान अवगत व्हावे, यासाठी आठवड्यातील एक दिवस बँगलेस सॅटर्डे म्हणून या प्रशालेत साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थ्यांनी आपली वह्या पुस्तके न आणता शाळेत यावयाचे असते. यावेळच्या सॅटर्डेला कौशल्य विकास, व्यक्तिमत्व विकास, व्यवहार ज्ञान या गोष्टींबाबत प्रशालेमध्ये धडे दिले जातात. या बॅगलेस सॅटर्डेला औचित्य साधून प्रशालेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जमीन खणून वाफे तयार करणे, त्यामध्ये बियाणे रुजविणे इत्यादी क्रिया करण्यासाठी प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. याचबरोबर बियाणाचा रोपापर्यंतचा जीवनप्रवास ध्वनीचित्रफितीद्वारे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक वर्ग, संस्थाचालक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 19/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow