चिपळूण : महामार्गालगत वृक्ष लागवडीची 'बनवाबनवी'; वृक्ष हक्क समिती आंदोलनाच्या पवित्र्यात

Jun 19, 2024 - 15:00
 0
चिपळूण :  महामार्गालगत वृक्ष लागवडीची 'बनवाबनवी'; वृक्ष हक्क समिती आंदोलनाच्या पवित्र्यात

चिपळूण : महामार्ग रुंदीकरण अंतर्गत झालेल्या वृक्षतोडीनंतर रुंद झालेल्या रस्त्याच्या दुतर्फा व मध्यभागी पुन्हा वृक्ष लागवड करावी, या मागणीसाठी चिपळुणातील वृक्ष हक्क समितीने केलेल्या आत्मक्लेष आंदोलनात महामार्ग विभाग व संबंधित ठेकेदारांनी दिलेल्या आश्वासनांची पोलखोल झाली आहे. समितीमधील काही सदस्यांनी वृक्षरोपांची पाहणी करताना ठेकेदार व महामार्ग विभागाने 'अशी ही बनवाबनवी केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे समिती सदस्य पुन्हा आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत.

कशेडी ते आरवली या दरम्यान महामार्गाचे रुंदीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान रुंदीकरणांतर्गत सुमारे वीस हजार झाडे तोडण्यात आली. बहुतांश झाडांमध्ये जांभूळ, आंबा, वड अशी काही स्थानिक पर्यावरणाचा समतोल राखणारी झाडे होती. तोडलेल्या झाडांची माहिती अद्यापही उपलब्ध झालेली नाही. झाडे तोडण्याचा ठेका कुणाला दिला? त्या बदल्यात संबंधितांनी किती रक्कम मोजली, तोडलेली झाडे कशी निष्काशित केली? या सर्व बाबी गुलदस्त्यात आहेत.

रुंदीकरणाचे काम अंतिम टण्यात आले असताना देखील शासनाच्या अध्यादेशात रस्त्याच्या दुतर्फा व मध्यभागी झाडे लावणे गरजेचे होते. मात्र, त्याकडे महामार्ग विभाग व ठेकेदाराने दुर्लक्ष केले होते. परिणामी, चिपळुणातील पर्यावरणप्रेमींनी या विरोधात एकवटून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आत्मक्लेष आंदोलनाचा इशारा दिला. त्यानुसार पर्यावरणप्रेमी महामार्ग कार्यालयावर एकवटले तातडीने या गोष्टीची दखल घेत महामार्ग विभाग व ठेकेदाराने वृक्ष लागवडीचे नियोजन करून तातडीने काम सुरू केले. त्यामुळे समितीने आंदोलन तात्पुरते स्थगित केले.

आश्वासनाप्रमाणे वृक्षलागवड नाही
यावेळी झालेल्या चर्चेनुसार स्थानिक व देशी प्रजातीची व दोन ते तीन वर्षे पूर्ण वाढ झालेली रोपे लावावीत, अशी सूचना केली होती. त्याप्रमाणे संबंधितांनी नियोजन करणार असल्याचे मान्य केले. परंतु प्रत्यक्षात आता समितीला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वृक्ष लागवड होत नसल्याचे सदस्यांच्या लक्षात येत आहे. बहुतांश रोपे फांदीसारखी वा लहान असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी केवळ झाडाच्या फांद्या लावल्याचे दिसून येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:25 PM 19/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow