शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त चिपळूणात वृक्षारोपण

Jun 20, 2024 - 09:58
Jun 20, 2024 - 10:12
 0
शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त चिपळूणात वृक्षारोपण

चिपळूण : शिवसेना चिपळूण यांच्या वतीने ५८ वा शिवसेना वर्धापन दिन उत्साहात झाला. यावेळी शिवसेना उपनेते तथा माजी आ. सदानंद चव्हाण, महिला आघाडी जिल्हा संघटक रश्मी गोखले, शिवसेना तालुकाप्रमुख संदेश आयरे, शहरप्रमुख उमेश सकपाळ, महिला आघाडी शहर संघटक प्राजक्ता टकले यांनी मनोगत व्यक्त केले. शिवसेना वर्धापन दिनाचे औचित्य साधून यावेळी 'झाडे लावा... झाडे जगवा' असा संदेश देत शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण यांच्यासह उपस्थित पदाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तालुका समन्वयक दिलीप चव्हाण, शहरप्रमुख उमेश सकपाळ, युवासेना शहरप्रमुख विनोद पिल्ले आदींसह शिवसेना उपतालुकाप्रमुख, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 20/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow