Ratnagiri : घरातील अडचण खात्रीशिर बाबाकरवी दूर करतो सांगून भावा-बहिणीची साडेसात लाखांची फसवणूक
रत्नागिरी : घरातील अडचण खात्रीशिर भोंदुबाबाकरवी दूर करतो, असे सांगून भावा-बहिणीची फसवणूक करत तब्बल साडेसात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवले. याप्रकरणी एकावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही फसवणूक २ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ४ ते ३० मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वा. कालावधीत कुवारबाव येथे करण्यात आली आहे.
सुभाष बाबासाहेब सुर्वे (रा. विश्वशांती संकुल नाचणे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात प्रसाद शंकर मराठे (४२, रा. बिल्वमंगल सोसायटी कुवारबाव, रत्नागिरी) यांनी अडीच महिन्यांनंतर मंगळवार, दि. १८ जून रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार, संशयित सुभाष सुर्वे याने प्रसाद मराठे आणि त्यांच्या बहिणीला मी तुमच्या घरातील अडचणी माझ्या ओळखीच्या बाबांमार्फत दूर करतो, असे सांगितले. त्यासाठी देवापुढे आकार देण्यासाठी तुमचे दागिने लागतील, असेही त्यांना सांगितले.
या दोघांचा विश्वास संपादन करून सुर्वे याने प्रसाद मराठेंच्या बहिणीचे दागिने घेऊन ते काम झाल्यानंतर परत आणून देतो, असे सांगून वेळोवेळी असे एकूण ७ लाख ५० हजारांचे दागिने घेऊन गेला. परंतु, काही महिन्यांचा कालावधी होऊन गेल्यानंतरही त्याने दागिने परत न केल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मराठे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी संशयिताविरोधात भा. दं. वि. कायदा कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 20-06-2024
What's Your Reaction?