दीपिकाच्या 'या' कृतीवर नेटकऱ्यांचा संताप

Jun 20, 2024 - 12:24
Jun 20, 2024 - 12:26
 0
दीपिकाच्या 'या' कृतीवर नेटकऱ्यांचा संताप

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone)कायमच आपल्या चित्रपटातील भूमिकांमुळे, प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यातील गोष्टींमुळे चर्चेत असते. सध्या दीपिका पदुकोण ही पाच महिन्यांची गरोदर आहे.

मॉम टू बी दीपिकाने बुधवारी संध्याकाळी आगामी 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटला हजेरी लावली. या वेळी ब्लॅक बॉडिकॉन ड्रेसमध्ये असलेल्या दीपिकाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. बेबी बम्प दाखवणाऱ्या दीपिकावर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. तर, काहींनी या कार्यक्रमात हजेरी लावलेल्या दीपिकावर दोन खडे बोल सुनावण्याचा प्रयत्न केला.

दीपिकावर नेटकरी का संतापले?

बुधवारी, 19 जून रोजी झालेल्या कार्यक्रमात दीपिका ब्लॅक बॉडिकॉन ड्रेसवर हाय हिल्स वेअर केले होते. हाय हिल्सवरून नेटकऱ्यांनी दीपिकाला सुनावले. दीपिका 5 महिन्यांची गरोदर आहे आणि अशा हाय हिल्समुळे तिच्यावर टीका झाली. एका युजरने म्हटले की, गरोदरपणात अशा हाय हिल्स धोकादायक असतात. दुसऱ्या युजरने म्हटले की, तुम्हाला किती सुंदर, ग्लॅमरस दिसायचे असले तरी अशा अवस्थेत हाय हिल्स टाळायला हवे. दीपिकाच्या हाय हिल्सवर अनेकांची प्रश्न उपस्थित केले.

दीपिका पदुकोणच्या काही चाहत्यांनी तिची बाजू घेतली. दीपिकाला हाय हिल्सवरून ट्रोल करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे की हाय हिल्समुळे काहीही अडचण होत नाही असे एका युजरने म्हटले. हाय हिल्समध्ये गरोदर स्त्रीला आपला तोल सांभाळता येत असेल तर काहीच हरकत नाही. दीपिका ग्लॅमरस दिसत असल्याचे या युजरने म्हटले. तिला हाय हिल्स वेअर करून वावरण्याची सवय आहे. त्यामुळे तिच्याबद्दल उगाच अति काळजी करू नये असेही एका युजरने म्हटले.

कधी रिलीज होणार 'कल्की 2898 एडी'?

'कल्की 2898 एडी' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केले आहे. चित्रपटात प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हसन, दिशा पटानी यांचा समावेश आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटात प्रभास भैरवची भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर अमिताभ बच्चन अश्वत्थामाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट 27 जून रोजी रिलीज होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 20-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow