जिओनंतर आता एअरटेलचाही डेटा पॅकच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय

Jun 28, 2024 - 11:52
 0
जिओनंतर आता एअरटेलचाही डेटा पॅकच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय

रिलायन्स जिओ (Reliance Jio) या टेलिकॉम कंपनीने नुकतेच आपल्या इंटरनेट पॅकमध्ये वाढ केली आहे. या वाढीचा थेट फटका सामान्यांना बसणार आहे. रिलायन्स जिओच्या या निर्णयानंतर आता एअरटेल (Bharti Airtel) या टेलकॉम कंपनीनेही आपल्या इंटरनेट पॅकमध्ये वाढ केली आहे.

भारती एअरटेलने आपल्या इंटरनेट पॅकमध्ये साधारण 10-21 टक्क्यांनी वाढ केली आहे. नव्याने वाढ झालेल्या इंटरनेट पॅकचा दर 3 जुलै 2024 पासून लागू होणार आहे. भारती एअरटेलने प्रिपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही विभागांत इंटरनेट प्लॅन्समध्ये वाढ केली आहे.

एअरटेलचे नवे दर काय? 

एअरटेलने वाढ केलेल्या इंटरनेटचे दर येत्या 3 जुलैपासून लागू होतील. आता नव्या दरानुसार एअरटेलचा 179 रुपयांना असलेला सर्वांत स्वस्त प्लॅन आता 199 रुपयांना झाला आहे. एअरटेलचा प्रिपेड हा एंट्री प्लॅन असून त्याची मुदत 28 दिवस आहे. त्यानंतर 84 दिवसांचा 455 रुपयांचा प्लॅन आता 509 रुपये करण्यात आला आहे. 365 दिवसांचा 1799 रुपयांचा प्लॅन आता 1999 रुपये करण्यात आला आहे.

पोस्टपेड डेटा प्लॅनमध्येही मोठा बदल 

भारती एअरटेलने प्रिपेड प्लॅनसह पोस्टपेड प्लॅनमध्येही मोठा बदल केला आहे. एअरटेलचे एकूण चार पोस्टपेड प्लॅन होते. हे प्लॅन अनुक्रमे 399, 499, 599 आणि 999 रुपयांचे होते. 399 रुपयांच्या प्लॅनवर 40 जीबी टेडा मिळायचा तसेच एक्स्ट्रिम प्रिमियमचे सबस्क्रिप्शनही मिळायचे. आता हाच प्लॅन 449 रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

नेमकं काय वाढलं?

499 रुपयांच्या प्लॅनमधअये 75 जीबी डेटा मिळायचा. या प्लॅनमध्ये डिस्ने-हॉटस्टार, सहा महिन्यांसाठी अमेझॉन प्राईम सबस्क्रिप्शन, एस्क्ट्रिम प्रिमियम सबस्क्रिप्शन मिळायचे. आता हाच प्लॅन 549 रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. 599 रुपयांच्या प्लॅनवर अगोदर 105 जीबी डेटा मिळायचा. तसेच या प्लॅनमध्ये 12 महिन्यांसाठी डिस्ने-हॉटस्टार, सहा महिन्यांसाठी अमेझॉन प्राईम सबस्क्रिप्शन, एस्क्ट्रिम प्रिमियम सबस्क्रिप्शन मिळायचे. हेच सबस्क्रिप्शन आता 699 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. 999 रुपयांच्या सबस्क्रिप्शनमध्ये एकूण 190 जीबी डेटा मिळायचा. तसेच 12 महिन्यांसाठी डिस्ने-हॉटस्टार, सहा महिन्यांसाठी अमेझॉन प्राईम सबस्क्रिप्शन, एस्क्ट्रिम प्रिमियम सबस्क्रिप्शन मिळायचे. हाच प्लॅन आता 1199 रुपयांना झाला आहे.

दरम्यान, जिओच्या निर्णयानंतर एअरटेलनेही आपल्या इंटरनेट पॅकमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे एकंदरीतच इंटरनेट वापरणे महाग झाल्याची भावना व्यक्त केली जाते.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 28-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow