चिपळूण : सवतसडा धबधबा प्रवाहित

Jun 20, 2024 - 17:08
 0
चिपळूण : सवतसडा धबधबा प्रवाहित

चिपळूण : पावसाळा सुरू झाल्यानंतर उत्तर रत्नागिरीमध्ये आज पहिल्यांदाच मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. गेले दोन ते अडीच तासांपासून चिपळूणसह खेड, दापोली आणि गुहागरमध्ये धुवाधार पाऊस सुरू झाला असून या परिसरातल्या नद्या प्रवाहित झाल्या आहेत. 

चिपळूणमधील प्रसिद्ध असलेला सवतसडा धबधबा प्रवाहित झाल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खुणाऊ लागलाय. कोकणात वेधशाळेकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता, त्यानुसार सध्या सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:36 20-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow