रत्नागिरी : रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिट्यूट मानवी हक्क अभ्यासक्रमाचा निकाल १०० टक्के

Jun 21, 2024 - 12:09
 0
रत्नागिरी :  रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिट्यूट मानवी हक्क अभ्यासक्रमाचा निकाल १०० टक्के

रत्नागिरी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाले असून त्यामध्ये रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिट्यूटचा मानवी हक्क अभ्यासक्रमाचा निकाल १०० टक्के लागला.

मानवी हक्क अभ्यासक्रमात माधुरी गमरे (८४ टक्के) या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. द्वितीय समीर घडशी (८३.६७ टक्के), तृतीय नामदेव जाधव (८२ टक्के) यांनी यश मिळवले, सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिटयूटच्या प्रमुख धनश्री पालांडे व केंद्र संयोजक अंकुश कदम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 

दरम्यान, पत्रकारिता पदविका आणि मानवी हक्क शिक्षणक्रम या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पत्रकार होण्यासाठी उपयुक्त असणारा अभ्यासक्रम हा बारावी उत्तीर्ण, बारावी समकक्ष कोणताही शासनमान्य कोर्स तसेच मुक्त विद्यापीठाचा पूर्वतयारी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल. मानवी हक्क शिक्षणक्रमासाठी दहावी उत्तीर्ण तसेच समकक्ष कोणताही शासनमान्य कोर्स तसेच मुक्त विद्यापीठाचा पूर्वतयारी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 PM 21/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow