राजापूर : खरेदी विक्री संघ कृषी साहित्यांनी सज्ज

Jun 21, 2024 - 15:11
 0
राजापूर : खरेदी विक्री संघ कृषी साहित्यांनी सज्ज

राजापूर : शासनाच्या वतीने चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांना अडचणी येऊ नये, यासाठी खरेदी विक्री संघामार्फत मुबलक भात बियाणे, खते, शेती अवजारांची उपलब्धता करण्यात आली आहे. राजापूर तालुका खरेदी विक्री संघामार्फत शेतकऱ्यांना खते व बियाण्यांची उपलब्धता करण्यात आली असून सुधारित जातीच्या संकरित बियाण्यांना शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे. यावर्षी तालुक्यात ११० क्विंटल भात बियाणे खरेदी विक्री संघामार्फत वितरित करण्यात आले.

यंदा सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाल्याने शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे. शेतकऱ्यांना वेळेवर भात बियाणे उपलब्ध होण्यासाठी खरेदी विक्री संघामार्फत मुबलक भात बियाणे उपलब्ध करण्यात आली.

तर सिंधुरत्न योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना मोफत धान्य उपलब्ध झाले होते. तालुक्यातील ९८ लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. सुमारे ११६७ किलो बियाणे या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वितरित करण्यात आल्याची माहिती खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक दिपक कानविंदे यांनी दिली.

भात बियाण्यांबरोबरच शेतकऱ्यांना युरिया, सुफलासारखी खते अनुदानावर उपलब्ध करण्यात आली आहेत. राजापूर खरेदी विक्री संघामार्फत युरिया ६०२ टन, सुफला १८० टन, मिश्र ८२ टन, सुपर फॉस्पेट, अन्य सेंद्रिय अशी सुमारे १०६० टन खत उपलब्ध करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:37 PM 21/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow