माझ्या जीवाला धोका, बच्चू कडूंचे पोलिसांना पत्र

Jun 21, 2024 - 12:49
Jun 21, 2024 - 15:50
 0
माझ्या जीवाला धोका, बच्चू कडूंचे पोलिसांना पत्र

अमरावती : प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्र जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षकांना लिहिले आहे. याप्रकरणी त्यांनी पोलिसांना चौकशी करून योग्य ती कारवाई करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

माझा अपघात झाला अशा प्रकारचे नागरिकांचे फोन येत आहेत. अपघात झाल्याची कोणीतरी अफवा पसरवत आहे असा दावा बच्चू कडू यांनी या पत्रात केला आहे. दरम्यान, बच्चू कडू यांच्या पत्रामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

बच्चू कडू यांच्या पत्रात काय?

गेल्या अनेक दिवसांपासून बच्चू कडू यांना निनावी फोन येत आहेत. भाऊ तुमचा अपघात झाला आहे का? तुमची तब्येत कशी आहे? असे काही प्रश्न या फोनवरुन विचारले जातात. त्यानंतर फोन करणाऱ्यांनाच याबाबत जाब विचारला. तर धमक्या येत असल्याचा प्रकार समोर आला. हे सर्व बच्चू कडू यांनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

गोपनीय माहितीनुसार माझ्या जीवाला धोका

मिळालेल्या माहितीनुसार, गोपनीय माहितीनुसार माझ्या जीवाला धोका असल्याची माहिती बच्चू कडू यांनी पोलिसांना पत्राद्वारे दिली आहे. माझा अपघात झाला अशा प्रकारचे नागरिकांचे फोन येत असून अपघात झाल्याची अफवा पसरवत असल्याचे बच्चू कडू यांनी पत्रात नमूद केले आहे. तसेच, प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधीतावर गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करण्याची मागणी बच्चू कडू यांनी पत्रातून केली आहे.

बच्चू कडूंना वाय प्लस सुरक्षा

दरम्यान, सध्या बच्चू कडू यांना पोलिसांनी वाय प्लस सुरक्षा दिली आहे. बच्चू कडू यांच्या जीवाला धोका असल्याच्या बातमीने संपूर्ण अमरावतीत खळबळ पसरली आहे. याप्रकरणी आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

पत्रातील ठळक मुद्दे

शिंदे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे. मी गडचिरोलीत राहत असून माझे नक्षलवाद्यांशी नजीकचे संबंध आहेत, बच्चू कडूला पाहून घेऊ जसे बाळासाहेब ठाकरे यांनी दिघेंना संपवले, तसं शिंदे साहेब बच्चू कडूला संपवणार नाही तर मी स्वतः बच्चू कडूला संपवणार. बच्चू कडू म्हणजे काहीच नाही बच्चू कडूला पाहून घेऊ, अशा धमक्या येत असल्याचे बच्चू कडू यांनी पत्रात नमूद केले आहे. आज मौका देख के, बच्चू कडू को चौका मारेंगे, अशी धमकी येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:05 21-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow