नाशिक आणि रत्नागिरीमध्ये रंगणार 'एमपीएल 2024'चा अंतिम थरार

Jun 22, 2024 - 16:57
Jun 22, 2024 - 17:22
 0
नाशिक आणि रत्नागिरीमध्ये रंगणार 'एमपीएल 2024'चा अंतिम थरार

मुंबई : साहिल पारिख (६८धावा), अथर्व काळे (नाबाद ५३) यांनी धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर ईगल नाशिक टायटन्स संघाने पुनीत बालन ग्रुप कोल्हापूर टस्कर्स संघाचा ६ गडी राखून पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला.

चषकासाठी नाशिकचा सामना आता रत्नागिरीसोबत होणार आहे. अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार? याकडे चाहत्यांचं लक्ष लागलेय. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २०षटकात ५ बाद २०२ धावांचा डोंगर उभा केला. अंकित बावणेने आक्रमक फलंदाजी करत ४७चेंडूत नाबाद ७७ धावांची खेळी केली. आक्रमक अर्धशतक खेळी करताना अंकित बावणेने ३ चौकार व ३ टोलेजंग षटकार मारले. त्याला सचिन धसने २९ चेंडूत ७ चौकार व १ षटकारासह ४५ धावांची ताबडतोब खेळी करून साथ दिली. या सलामी जोडीने ५१चेंडूत ८३ धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात सचिन धस झेल बाद झाला. प्रशांत सोळंकीने त्याला झेल बाद केले. पाठोपाठ राहुल त्रिपाठी (११) ला देखील झेल बाद करून कोल्हापूर संघाला दुसरा धक्का दिला. त्यानंतर अंकितने सिध्दार्थ म्हात्रेच्या साथीत चौथ्या विकेटसाठी ४१चेंडूत ६१ धावांची भागीदारी करून संघाची धावगती वाढवली. सिध्दार्थ म्हात्रेने २६ चेंडूत ४चौकार व १षटकारासह ३८धावा केल्या. त्यानंतर अंकितने योगेश डोंगरे (१८) च्या समवेत भागीदारी करून संघाला २०० धावांचा टप्पा पार करुन दिला.

२०२ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या ईगल नाशिक टायटन्स संघाने १८ षटकात ४ बाद २०५ धावा काढून पुर्ण केले. मंदार भंडारी (१९) व अर्शिन कुलकर्णी (११) हे सलामीचे फलंदाज मोठी खेळी करू शकले नाहीत. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या साहिल पारिखने ३३ चेंडूत ६८ धावांची तुफानी खेळी केली. साहिलने अफलातून फलंदाजी करताना ३चौकार व ६उत्तुंग षटकार ठोकले. साहिल व कौशल तांबे (२८धावा) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५५ चेंडूत ९६ धावांची भागीदारी करताना संघाच्या डावाला आकार दिला. १३व्या षटकात अखेरच्या चेंडूवर फिरकीपटू अथर्व डाकवेने साहिल पारिखला झेल बाद करून ही जोडी फोडली. पाठोपाठ पुढच्याच षटकात श्रेयस चव्हाणने कौशल तांबेला पायचीत बाद केले व नाशिक टायटन्स संघाला चौथा धक्का दिला.

त्यानंतर अथर्व काळेने २० चेंडूत ५३ धावांची वादळी खेळी केली. त्याने आपले अर्धशतक साजरे करताना २ चौकार व ७ षटकार ठोकून मैदान दणाणून सोडले. अथर्व व रणजीत निकम (नाबाद १४) यांनी पाचव्या विकेटसाठी ३९ चेंडूत ६९ धावांची भागीदारी करून संघाचा विजय सुकर केला.

संक्षिप्त धावफलक
पीबीजी कोल्हापूर टस्कर्स: २० षटकात ५ बाद २०२ धावा (अंकित बावणे नाबाद ७७ (४७,६४,३४६), सचिन धस ४५ (२९,७०४,१०६), सिध्दार्थ म्हात्रे ३८ (२६,४४४,१०६), योगेश डोंगरे १८, राहुल त्रिपाठी ११, मुकेश चौधरी २-३५, प्रशांत सोळंकी २-३२) पराभुत वि. ईगल नाशिक टायटन्सः १८षटकात ४बाद २०५धावा (साहिल पारिख ६८ (३३,३४४,६०६), अथर्व काळे नाबाद ५३ (२०,२४४,७४६), कौशल तांबे २८, रणजीत निकम नाबाद १४, श्रेयस चव्हाण २-४७, अथर्व डाकवे १-३५, उमर शहा १-२७); सामनावीर साहिल पारिख.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:45 PM 22/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow