संगमेश्वर : करंबेळे घाटामधील रस्त्याचा भराव खचला..; प्रवासासाठी धोकादायक स्थिती

Jun 24, 2024 - 11:54
Jun 24, 2024 - 12:22
 0
संगमेश्वर : करंबेळे घाटामधील रस्त्याचा भराव खचला..; प्रवासासाठी धोकादायक स्थिती

संगमेश्वर : देवरूख संगमेश्वर राज्यमार्गावरील करंबेळेघाटी येथे रस्त्त्याच्या बाजूचा भराव खचल्यामुळे या ठिकाणाहून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. पावसामुळे हा भराव अजून खचत जाऊन रस्तादेखील खचण्याची शक्यता आहे; परंतु याकडे सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे.

साखरपा देवरूख-संगमेश्वर हा राज्यमार्ग वर्दळीचा आहे. दररोज अनेक वाहने या मार्गावरून दणवळण करत आहेत; मात्र काही ठिकाणी या मार्गाला साईडपट्टीच नसल्याचे चित्र पाहायला मिळते. रस्त्याला साईडपट्टी नसल्यामुळे अनेक अपघात होत आहेत. पा अपघातात अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. या मार्गावरील शेवरवाडी थांब्यापासून सुमारे तीनशे ते साडेतीनशे मीटर अंतरावर रस्त्याच्या बाजूला पूर्णतः भराव खचला आहे. भराव खचलेल्या खालील बाजूला मोठी दरी आहे. त्यामुळे एखादे वाहन फसल्यास खोल दरीत जाण्याचा धोका या ठिकाणी निर्माण झाला आहे. गेल्या वर्षापासून ही स्थिती असून या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधीचेदेखील दुर्लक्ष होताना दिसत आहे. सद्यःस्थितीला या ठिकाणी सत्याचर सावधानतेचा इशारा म्हणून दगड लावून ठेवण्यात आले आहेत.

सततच्या पावसामुळे तर अजूनच रस्त्याखालील भरावाची धूप होऊन रस्ता ब्लॉक होण्याची भीती निर्माण झाली आहे. असे झाल्यास दळणवळणाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. गतवर्षी निर्माण झालेल्या या समस्येकडे पाहायला कोणालाच वेळ नाही, अशी अवस्था झाली असून एखादी दुर्घटना होत नाही तोपर्यंत कुठल्याच विभागाला जाग येणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 24/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow