खेड : नांदगावात मातीचा भराव रस्त्यावर

Jun 24, 2024 - 12:09
 0
खेड : नांदगावात मातीचा भराव रस्त्यावर

खेड : तालुक्यातील नांदगाव खाडीपट्टयातील बसथांब्यानजीक मे महिन्यात डोंगरकटाई करण्यात आल्याने सर्व मातीचा भराव मार्गावर कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, वाहनचालकांना वाहने हाकताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या चिखलात दुचाकींसह चारचाकी वाहनेही फसत असून, अपघातांचा धोका कायम आहे.

या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते तसेच पादचाऱ्यांचीही रहदारी सुरू असते. मे महिन्यात डोंगरकटाईत सर्व मातीचा भराव रस्त्यावर आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. यामुळे हळूहळू माती रस्त्यावर कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. या मार्गावरून प्रवास करणे जिकिरीचे बनले असून, मार्ग सुस्थितीत आणण्यासाठी अजूनही प्रशासनाला सवड मिळालेली नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 PM 24/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow